
एखाद्या दुर्घटनेत जायबंदी झाल्यास वा मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम देण्याची जबाबदारी पंपन्यांची आहे. मात्र दारू ढोसून मृत्यू झाल्यास विमा देण्याची जबाबदारी कंपन्यांची नाही, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला.
हिमाचल प्रदेशात सिमला येथे 1997 मध्ये एका चौकीदाराचा मृत्यू झाला. अत्याधिक दारू पिल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले. हा मृत्यू दुर्घटनेत होणाऱया मृत्यूच्या श्रेणीत येत नाही, त्यामुळे विमा कंपनीवर रक्कम देण्याची कोणतीही जबाबदारी येत नाही असा निकाल राष्ट्रीय ग्राहक मंचाने दिला होता.
या निकालाला संबंधित चौकीदाराच्या वारसाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्या. एम. एम. शांतानागौर व न्या. विनीत शरण यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.
खंडपीठाने राष्ट्रीय ग्राहक मंचाने दिलेला निकाल कायम ठेवला. चौकीदाराचा मृत्यू कोणत्याही दुर्घटनेत झालेला नाही. त्यामुळे विमा कायद्यानुसार विमा पंपनीवर कोणतीही जबाबदारी येत नाही, असे खंडपीठाने स्पष्ट करीत ही याचिका निकाली काढली.




























































