कर्जमुक्तीची रक्कम तीन महिन्यांत खात्यात जमा करणार

646

ह शेतकऱयांना कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना सुरू झाली असून तीन महिन्यांत या योजनेंतर्गत शेतकऱयांना पैसे दिले जातील, असा प्रयत्न राज्य शासनामार्फत केला जात आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात सोलापूर जिल्हा रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सोलापूर जिह्यातील शेतकऱयांची माहिती घेतली जाईल. या जिल्ह्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊ, असे ते म्हणाले. बबनदादा शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य भारत भालके यांनी भाग घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या