
‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’नंतर आता अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी चौथ्यांदा एकत्र काम करणार असल्याची चर्चा आहे. ‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटानंतर भन्साळी आता आगामी ‘बैजू बावरा’ या चित्रपटाच्या तयारीला लागले आहेत. यातील डाकू रुपमतीच्या भूमिकेसाठी त्यांची पहिली पसंती दीपिका पदुकोण हिच्या नावाला आहे. याबाबत भन्साळी आणि दीपिका यांनी मात्र काहीही अधिकृतरित्या सांगितले नाही. परंतु या चित्रपटासाठी त्यांच्यात खूप वेळा मीटिंग झाल्याचं कळतंय. यापूर्वी ‘गंगुबाई काठीयावाडी’ आणि ‘हिरा मंडी’ या दोन चित्रपटांसाठी देखील भन्साळी यांनी दीपिकाला छोटय़ा भूमिकेसाठी विचारले होते. परंतु दीपिकाने या ऑफर धुडकवल्या होत्या. दीपिका ही ऑफर स्वीकारेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


























































