अखेर दीपिका पादूकोणने पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी…..

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री दीपिका पादूकोण गर्भवती असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र दीपिकाने या चर्चांना आता पूर्णविराम लावला आहे. दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंग लवकरच आई-बाबा होणार आहेत. दिपिकाने काही वेळापूर्वी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन याबाबत पोस्ट शेअर करत कबुली दिली आहे.या गोड बातमीने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून अभिनंदनाचा पाऊस पडतोय.

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादूकोणने तिच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गुरुवारी 29 फेब्रुवारी रोजी, दीपिका आणि रणवीरने त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एकत्र पोस्ट शेअर करत चाहत्यांना गोड बातमी दिली.. त्यांनी एक फोटो शेअर केला आहे ज्यावर ‘सप्टेंबर 2024’ असे लिहिलेले आहे. ज्यातून सप्टेंबरमध्ये ते बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत असे दिसत आहे.