दीपिकामध्ये झाला जबरदस्त बदल, ओळखता येणंही झालं कठिण

2147

अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्या छपाकमधील लूकची चाहत्यांनी जबरदस्त प्रशंसा केली होती. छपाकमध्ये दीपिकाने अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अगरवालची भूमिका केली होती. लक्ष्मीच्या लूकमध्ये तिला ओळखणे कठिण झाले होते. आता पुन्हा एकदा ती तिच्या आगामी चित्रपटात एका वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे.

आगामी ’83’ या चित्रपटात दीपिका पदुकोण ही कपिल देव यांच्या पत्नी रोमी देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या या भूमिकेचा फर्स्ट लूक आज रिलीज करण्यात आला आहे. या लूकमध्ये दिपीकाने छोट्या केसात दिसत आहे. आतापर्यंत प्रत्येक चित्रपटात लांब सडक केसात दिसलेली दिपीका या चित्रपटात एका वेगळ्या हेअरस्टाईलमध्ये दिसत असल्याने तिला ओळखणेही कठिण आहे.

बॉलिवूडमधील रोमँटिक कपल रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण आगामी ’83’ या चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहेत. कबीर सिंह या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून रणवीर 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. चौथ्यांदा ही जोडी चित्रपटगृहांमध्ये मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. या चित्रपटात दीपिकाची भूमिका छोटीशी असून जास्त सिन्सही तिच्या वाटेला आलेली नाहीत. त्यामुळे तिने ही भूमिका का स्वीकारली असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या