
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘कबीर सिंग’, ‘अर्जुन रेड्डी’ आणि ‘अॅनिमल’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. त्याचे चित्रपट खूप आवडतात. सध्याच्या घडीला तो प्रभाससोबत काम करत आहे. तो प्रभाससोबत ‘स्पिरिट’ हा चित्रपट बनवत आहे. हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार असून, या चित्रपटात दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत होती. पण आता अशी बातमी आहे की, दीपिका या चित्रपटाचा भाग नाही.
दीपिकाच्या अवास्तव मागण्यांना कंटाळून दीपिकाला डच्चू देण्यात आलेला आहे. अनेक तेलुगू वृत्तवाहिन्यांनुसार, संदीप वांगा रेड्डी यांनी दीपिकाला चित्रपटातून काढून टाकले आहे. काही मागण्यांवरून संदीप वांगा आणि दीपिका यांच्यात भांडण झाले. दीपिकाच्या अव्यावसायिक मागण्यांमुळे संदीप वांगा रेड्डी नाराज झाला.
दीपिकाने 8 तास काम करण्याची विनंती केली होती, त्यापैकी 6 तास प्रत्यक्ष शूटिंगचा वेळ आहे. दीपिकाने चित्रपटाच्या नफ्यातील वाट्यासह मोठी फी मागितली तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली. असेही म्हटले जात आहे की, दीपिकाने तिचे संवाद तेलुगूमध्ये बोलण्यासही नकार दिला. रिपोर्टनुसार, दीपिकाला स्पिरिटसाठी आतापर्यंतची सर्वाधिक फी मिळणार होती. ती 20 कोटी रुपये फी घेत असल्याचे वृत्त आहे. संदीप रेड्डी वांगा यांना हे आवडले नाही आणि त्यांनी दीपिकाला बाहेर काढले. आता ते दीपिकाच्या जागी दुसरा शोधत आहेत.
पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, दीपिकाच्या गरोदरपणामुळे चित्रपटाचे शूटिंग लांबणीवर पडले. चित्रपटातून काढून टाकल्याच्या बातमीवर दीपिका किंवा संदीप रेड्डी वांगा या दोघांनीही प्रतिक्रिया दिलेली नाही.