‘नंगा पुंगा’ रणवीरवर दीपिकाची प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाली….

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा कायम त्याच्या विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असतो. कधी महिलांसारखा स्कर्ट तर कधी पलाझो, कधी रंगीबेरंगी कपडे घालून त्याच्या अतरंगी स्टायलिंगमुळे रणवीर कायम लोकांचं लक्ष वेधून घेत असतो. यावेळी त्याने न्यूड फोटोशूट करून चांगलीच खळबळ माजवली आहे.

रणवीरने एका मासिकासाठी हे फोटोशूट केले आहे. त्या मासिकातील मुलाखतीत त्याने नग्नतेविषयी त्याचे बिनधास्त मत मांडले आहे. रणवीर सिंगचे हे फोटोशूट व्हायरल झाले असून काहींनी त्याला ट्रोल केले आहे तर काहींनी तो फारच मादक दिसत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी रणवीरची स्तुती केली आहे तर काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करत फटकारले आहे.

गंमत म्हणजे त्याची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने या शूटवर प्रतिक्रिया दिली आहे. दीपिकाला त्याचा हा प्रयोग आवडला आहे. इंटरनेटवर येण्यापूर्वी दीपिकाने हे फोटो पाहिले होते. तिने या फोटोशूटसाठी त्याला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. तिला या फोटोशूटमागची कल्पनाही भलतीच आवडली असल्याचं मतही तिने व्यक्त केलं आहे.