वाईटही वाटतं, पण… सर्वाधिक मानधन घेणाऱ्या दीपिकाचा खुलासा

1569

2008 मध्ये शाहरूख खान याच्या ‘ओम शांति ओम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या दीपिकाची इंडस्ट्रीतील टॉपची अभिनेत्री म्हणून गणना होते. दीपिका गेल्या एक दशकामध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. यशाच्या शिखरावर असणाऱ्या दीपिकाचा छपाक चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटामध्ये ती अॅसिड हल्ला झालेल्या महिलेची भूमिका साकारत आहे.

दीपिका सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी आणि सर्वाधिक कमाई घेणारी अभिनेत्री आहे. तिने अनेक बड्या अभिनेत्री याबाबतीत मागे टाकले आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये आपल्या कमाईबाबत काही खुलासे केले आहेत. मी किती पैसा कमावते याबाबत चर्चा करणे माझ्या डीएनएमध्ये नसल्याचे दीपिका म्हणाली.

‘हार्पर बाजार इंडिया’सोबत एका मुलाखतीमध्ये ती म्हणाली की, मी कुठे आहे आणि किती कमाई करते याबाबत चर्चा करणे माझ्या डीएनएमध्ये नाही. परंतु नेहमीच मी द्विधा मनस्थितीमध्ये असते. कारण आजच्या युगात सेलिब्रिटीच्या कमाईच्या चर्चा होणे रास्त आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री झाल्यानंतर तुला कसे वाटते? असा प्रश्न दीपिकाला विचारण्यात आला. याला उत्तर देताना दीपिका म्हणाली की, मला थोडे वाटही वाटते, पण… या सर्व गोष्टींवर लक्ष देण्यापेक्षा मला चित्रपटावर लक्ष केंद्रीत करणे जास्त आवडते.

तेव्हा कपडेही इस्त्री करायचे…

मुलाखतीमध्ये दीपिकाने आपल्या बॅचलर लाईफबाबतही काही किस्से सांगितले. मी जेव्हा सिंगल होते तेव्हा घरातील बरीचशी कामे स्वत: करायचे. अगदी कपडे देखील दिवसातून दोन वेळा इस्त्री करायची, असे ती म्हणाली.

आपली प्रतिक्रिया द्या