
काही वर्षांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हीचा डोळा मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या एका व्हिडिओमुळे प्रिया एका रात्रीत लाखो तरुणांच्या दिलाची ध़डकन झाली होती. पण आता ‘छपाक’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने अशा काही स्टाईलने डोळा मारला की सगळ्यांना प्रियाचा विसर पडेल.
दीपिकाने स्वत:च हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात ती छपाकची दिग्दर्शिका मेघना गुलजार बरोबर बोलता बोलता हसत सहज डोळा मारताना दिसत आहे. दिपिकाने हा व्हिडीओ प्रियालाही टॅग केला आहे.
दीपिकाची प्रमुख भूमिका असलेला छपाक हा चित्रपट 10 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. यात तिने अॅसिड अटॅक पीडिता लक्ष्मी मित्तलची भूमिका साकारली आहे. तर विक्रांत मैसी पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.






























































