पोरगं बापाचं लक्ष वेधण्यासाठी रडतं, तशी पाकिस्तानची स्थिती! हिंदुस्थानचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

कलम 370 रद्दबातल ठरवण्यात आल्यापासून आकांडतांडव करणाऱ्या पाकिस्तानवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कडाडून हल्ला चढवला आहे. ‘देवा, असा शेजारी कोणालाही मिळू नये’, असे राजनाथ सिंह म्हणाले. बुधवारी पाकिस्तानने हिंदुस्थानशी राजकीय संबंध तोडण्याचे, द्विपक्षीय व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच गुरुवारी समझौता एक्सप्रेस कायमस्वरुपी बंद करण्याचाही निर्णय घेतला. यानंतर पहिल्यांचा संरक्षणमंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

राजनाथ सिंह म्हणाले की, ‘सगळ्यात मोठी आणि वाईट गोष्ट अशी की पाकिस्तान आमचा शेजारी आहे. तुम्ही मित्र निवडू शकता, परंतु शेजारी नाही. पाकिस्तानसारखा देश आमचा शेजारी असून देव करो असा शेजारी कोणाला मिळू नये.’

लक्ष वेधण्यासाठी रडारड
‘पाकिस्तान कश्मीरच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून सहानुभूती मिळावी यासाठी एवढी रडारड करत आहे. परंतु यात ते यशस्वी होणार नाहीत. कलम 370 हटवणे संपूर्णत: हिंदुस्थानचा वैयक्तील मुद्दा आह. आपच्यासाठी राज्यघटना कालही प्रमथ होती, आजही आहे आणि उद्याही असेल’, असे विधान परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.