वेळेत उपचार मिळणे आरोपीचा अधिकार, उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कायद्याने त्यांनाही जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आजारी आरोपींना वेळेत उपचार दिले गेले पाहिजेत, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या महिला आरोपीला धर्मशाळेत स्थलांतरित करण्याची परवानगी दिली. 2019 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील लँडमाइन स्फोटाप्रकरणी निर्मला उपुगंती या महिलेला अटक करण्यात आली. आरोपी महिला भायखळा तुरुंगात शिक्षा भोगत असून ती कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजवर आहे. त्यामुळे तिला तुरुंगातून धर्मशाळेत दाखल करण्याची मागणी करत अॅड. पायोशी रॉय यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान आरोपीला उपचार मिळणे हा त्याचा अधिकार असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले.