दिल्लीत कोरोनाचा प्रकोप; खासगी कार्यालये बंद करण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीत कोरोनाचा प्रकोप सुरुच आहे. दिल्लीत कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेत निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. दिल्लीतील सर्व खासगी कार्यालये बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिल्लीत कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता दिल्ली डिझास्टर मॅनेजमेंट अॅथॉरिटीने याबाबतचे आदेश दिले आहेत. दिल्लीत आतापर्यंत खासगी कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू होती.

दिल्लीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता दिल्ली डिझास्टर मॅनेजमेंट अॅथॉरिटीने निर्बंध अधिक कठोर केले आहेत. दिल्लीतील रेस्टॉरंट आणि बारही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.रेस्टॉरंटमधून होम डिलीवरी आणि टेकअवे सुविधा सुरू राहणार आहे. दिल्लीत आतापर्यंत 50 टक्के क्षमतेने रेस्टॉरंट सुरू होते. तसेच दिल्लीतील सर्व कार्यालये बंद राहणार असून अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांना यातून सूट देण्यात आली आहे.

देशासह राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात गेल्या 24 तासात 1,68,063 नवे रुग्ण आढळले असून 277 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोनाची स्थिती चिंताजनक असल्याने प्रशासनाने कठोर निर्बंध जारी केले आहेत.