स्तनात होणाऱ्या बहुतेक गाठी कॅन्सरच्या नसतात

1979

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जगभरात दिवसेंदिवस कॅन्सर रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे शरीरातील कुठल्याही भागात एखादी जरी गाठ आढळली तरी ती कॅन्सरचीच असावी अशी भीती लोकांच्या मनात बसली आहे. पण तज्ज्ञांच्या मते ही भीती बाळगणे योग्य नाही. कारण सगळ्याच गाठी कॅन्सरच्या नसतात. त्यातही स्तनात आढळणाऱ्या गाठीमागचे वेगवेगळे कारणं असतात. यामुळे अशी एखादी गाठ आढळल्यास घाबरण्याचे कारण नाही. पण तरीही सर्वप्रथम तज्ज्ञ डॉक्टरकडे जावे. तपासणी करावी. दरम्यान, स्तनांच्या विकासासाठी हॉर्मोन एस्ट्रोजेन-प्रोजेस्टेरॉन-प्रोलॅक्टिन-ऑग्जीटोसिन जबाबदार असतात. यांच्या विकासावर स्तनाचे आकारमान व आजार अवलंबून असते.

सामान्यतह: स्तनात चार प्रकारच्या गाठी आढळतात.

फायब्रोएडिनोमा -ही एक बेनाईन गाठ आहे. ही गाठ प्रामुख्याने तरुणींमध्ये आढळते.

स्तनामधील सिस्ट– या गाठी बेनाईन द्रवाने भरलेल्या असतात.

फायब्रोसिस्टीक– यात देखील ब्रेनाईन द्रव असते. या गाठी प्रामुख्याने प्रौढ महिलांच्या स्तनात आढळतात. त्यात फायबर स्ट्रोकही असतो.

कॅन्सरची गाठ- इतर गाठींच्या तुलनेत ही गाठ सर्वात कडक असते. ही गाठ शरीरात वाढत असताना वेदना होत नाहीत यामुळे बऱ्याचवेळा कॅन्सर झाल्याचे उशीरा कळते. यामुळे महिलांनी स्वत:च स्तनांची तपासणी करावी. यासाठी रोज स्तनांचे निरिक्षण करावे. दोन्ही स्तनाचा आकार सारखा आहे का किंवा त्यांच्या आकारमानात फरक आहे का हे पाहावे. शंका वाटल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आवश्यक असल्यास अल्ट्रासाऊंड,मॅमोग्राफी,बायोप्सी व इतर हार्मोन्सच्या चाचण्या कराव्यात.

हॉर्मोन्समुळे होतो बदल

स्तनात होणारे बदल हे प्रामुख्याने मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या हार्मोन्सच्या बदलांमुळे होतात. शरीरात ज्याप्रकारच्या हार्मोन्सचे प्रमाण कमी जास्त होते. त्यावर स्तनाचे आकारमान व अवलंबून असतात. या बदलांच्या वेळी स्तनात गाठीही तयार होतात. कधी कधी या गाठी वितळतात. तर काही वेळा त्या तशाच राहतात. यामुळे स्तनात गाठ आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जावे. कारण गाठ नक्की कसली आहे हे कळल्याशिवाय उपचार करता येत नाहीत.

आपली प्रतिक्रिया द्या