2014 पेक्षाही भव्यदिव्य होणार नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीतील दैदीप्यमान विजयानंतर नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. गुरुवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनातील प्रांगणात हा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे आधीच्या शपथविधी सोहळ्याच्या तुलनेत यावेळचा शपथविधी सोहळा भव्यदिव्य असणार आहे. या सोहळ्यास 6500 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. 2014 साली नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात 5000 पाहुण्यांनी सहभाग घेतला होता. पण यावेळी पाहुण्यांची संख्या अधिक असणार आहे.

या शपथविधी सोहळ्यात परदेशातील बड्या हस्ती देखील सहभागी होणार आहेत. या शपथविधी सोहळ्यास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी आर, ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत, मक्कल निधी मय्यमचे कमल हासन यांच्यासारखे नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. यांच्याव्यतिरिक्त विरोधी पक्षातील काही नेतेमंडळीही मोदींच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. तसचे यावेळी सार्क देश सोडून BIMSTEC देशांना आमंत्रित करण्यात आले आहे. नेपाळ-भुतान-मॉरिशिअसचे पंतप्रधान, श्रीलंका बांगलादेश-म्यानमारचे राष्ट्रपती, थायलँड-किर्गिस्तानचे प्रमुखदेखील या शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. गेल्यावेळी सार्क देशांचे प्रमुख शपथविधी सोहळ्यात सहभागी झाले होते. ज्यात पाकिस्तानही सहभागी झाला होता.