मनोज तिवारींनी भर स्टेजवर केली दाढी

1330

भाजपचे दिल्लीतील अध्यक्ष व खासदार मनोज तिवारी यांनी चक्क एका सभेत स्टेजवर बसून दाढी केली आहे. आधीच मनोज तिवारी या सभेसाठी दोन तास उशीरा आले त्यात ते दाढी करत असल्यामुळे कार्यक्रम सुरू होण्यास विलंब झाल्याने कार्यकर्ते संतापले होते असे समजते.

दिल्लीतील बुरारी भागात मनोजी तिवारी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेच्या स्टेजवर बसून मनोज तिवारी यांनी चक्क रेझर हातात घेऊन दाढी करण्यास सुरुवात केली. त्यांचा हा अवतार पाहून स्टेजवरील नेते व समोर बसलेले कार्यकर्तेही आश्चर्यचकित झाले. मात्र त्यावेळी मनोज तिवारी यांनी दाढी करणे हा देखील एक स्वच्छता मोहिमेचा भाग असल्याचे सांगितले. कार्यक्रमानंतर पत्रकारांनी याबाबत विचारले असता मनोज तिवारी यांनी माझ्या व्यस्त शेड्यूलमुळे त्यांना दाढी करायलाही वेळ मिळत नसल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या