
देशाची राजधानी दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरली होती. लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात 13 जणांचा बळी गेला होता. आता या प्रकरणात तपास यंत्रणांना मोठे यश आले असून दहशतवादी नेटवर्कशी संबंधित चौथी संशयित कार जप्त करण्यात आली आहे. फरिदाबादमधील अल-फलाह विद्यापीठाच्या पार्किंगमधून ही कार जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठाच्या पार्किंगमध्ये सिव्हर रंगाची मारुती ब्रेझा उभी असल्याचे तपास यंत्रणांना आढळून आले. यानंतर दहशतवादविरोधी पथक, राष्ट्रीय तपास यंत्रणा, बॉम्ब निकामी पथक आणि फॉरेन्सिक पथकाने धाव घेतली आहे. वाहनाची कसून चौकशी केली जात असून ही कार डॉ. शाहीन यांच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे याआधी डॉ. शाहीन यांची दुसरी कारही जप्त करण्यात आली होती. या कारमध्ये असॉल्ट रायफल सापडली होती.
Delhi Bombblast बाबरीचा घ्यायचा होता बदला; सहा डिंसेंबर, सहा ठिकाणं… असा होता दहशतवाद्यांचा प्लॅन



























































