
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
प. बंगालमध्ये सुरू असलेल्या सीबीआय प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वादावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. ममता बॅनर्जींना पंतप्रधान मोदी त्रास देत आहेत, ते सगळ्यांनाच त्रास देत आहेत, अशा शब्दात त्यांनी हल्ला केला आहे.
ममता बॅनर्जींनी सीबीआय विरोधात छेडलेल्या आंदोलनाला केजरीवाल यांनी पहिल्या दिवसापासूनच पाठिंबा दिला आहे. यासगळ्या मागे पंतप्रधान मोदीच असल्याचा आरोप ते करत आले आहेत. माझ्या घरी देखील पोलिसांनी छापे मारले होते, माझ्या सचिवाच्या घरी देखील धाडी टाकल्या होत्या. आता ममताजींवर धाडी घालत आहेत. हे योग्य नाही, देशाच्या लोकशाही करता हे घातक आहे, असेही केजरीवाल यावेळी म्हणाले.
Delhi CM: Mamata Banerjee ko pareshan kar rahe hain Modi Ji, sabko pareshan kar rahe hain. Mere ghar pe inhone police ki raid karai thi, mere secretary ke upar raid karai thi, ab Mamata Ji pe raid kara rahe hai. Ye thik nahi hai, desh ki jantantra ke liye thik nahi hai. pic.twitter.com/vAJ1bWDwAk
— ANI (@ANI) February 5, 2019
























































