दिवाळीत जवळच्या व्यक्तीला गिफ्ट काय द्याल?

167

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

दिवाळी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो खमंग दिवाळी फराळ ,आकर्षक रोषणाई आणि वेगवेगळे गिफ्टस. त्यातही हे गिफ्ट जर जवळच्या व्यक्तीला द्यायचे असेल नक्की काय द्याव हा प्रश्न पडतोच. त्यातच महिलांना गिफ्ट देण्यासाठी अनेक पर्याय बाजारात उपलब्ध असतात. पण त्या तुलनेत पुरूषांना उपयोगी येईल अशा वस्तू मयार्दित असतात. पण आता यालाही उत्तम पर्याय बाजारात आले आहे्त. ऑनलाईनवरही या वस्तू उपलब्ध आहेत.

coffe-mug

कॅमेरा कॉफी मग
प्लास्टीकचा हा मग दिसायला आकर्षक असून अगदी DSLR लॅन्ससारखा दिसतो. याची किंमत खिशाला परवडणारी असल्याने बजेटमध्येही बसतो. ४०० ते ५०० रुपये एवढी याची किंमत आहे. हा कॅमेरा मग म्हणजे मॉडल EF 24 24-105 एसएस f/4L IS USM ची कार्बन कॉपी आहे.

wifi-connector

वायफाय कनेक्टर
हल्ली इंटरनेटचा जमाना आहे. मोबाईल आणि नेट शिवाय आता पानही हलत नाही. यामुळे जशी स्थळी कुठेही गेलात तरी इंटरनेटची गरज सगळ्यांनाच असते. यामुळे एखाद्याला वायफाय कनेक्टर गिफ्ट म्हणून देण्याकडे तरुण तरुणींचा कलही वाढू लागला आहे. लॅपटॉपमध्ये तुम्ही वायफाय कनेक्ट करू शकता. पण डेस्कटॉपमध्ये मात्र विना वायफाय कार्ड कनेक्ट करता येत नाही. याला वायफाय कनेक्टर हा उत्तम पर्याय आहे. २०० ते ५०० रुपये याची किंमत आहे.

kurti-gift

डिझायनर कुर्ती

डिझायनर कुर्ती गिफ्ट म्हणून देता येते. हल्ली बाजारात कॉटन व सिल्कच्या आकर्षक कुर्ती मिळतात. दिवाळी किंवा इतर सणाच्या दिवशीही या कुर्ती वापरता येतात. ५०० पासून हजारो रुपयांपर्यंत या कुर्ती सगळ्याच दुकानात उपलब्ध आहेत.

wallet-3

वॉलेट
बरेचजण खिशात वॉलेट ठेवतात. यामुळे बजेटमधल्या खरेदीत वॉलेटचा वरचा क्रमांक आहे. आता तर साध्या वॉलेटपासून लेदरचे ब्रँडेड वॉलेट बाजारात मिळतात. त्यातच दिवाळी असल्याने बॅग, शूज, वॉलेटवरही कंपन्या भरघोस ऑफरही देतात. यामुळे गिफ्ट म्हणून या वस्तूंचा विचार करायला हरकत नाही.

watch-gift

घड्याळ
जर तुमचे बजेट थोडे जास्त असेल तर या दिवाळीला जवळच्या व्यक्तीला गिफ्ट म्हणून घड्याळ देण्यास मागे पुढे करू नका. सध्या सगळीकडे दिवाळीचा सेल सुरू आहे. यात महागड्या ब्रँडेड वस्तूंवर तर भरघोस सूट देण्यात येत आहे. यामुळे ही दिवाळी अविस्मरणिय बनवायची असेल तर घड्याळ हा उत्तम पर्याय आहे.

perfume

परफ्युम

महिलांप्रमाणेच पुरूषांनाही सुंगधाची आवड असते. त्यातही जर उंची परफ्युम तुम्ही जवळच्या व्यक्तीला भेट म्हणून दिलत तर त्याचा सुगंध संबंधित व्य्कतीला सतत तुमची आठवण करुन देईन. १०० रुपयांपासून हजारो, लाखो रुपये किंमतीचे परफ्युम बाजारात उपलब्ध आहेत.

book-gift

पुस्तके

जर एखाद्याला वाचनाची आवड असेल तर पुस्तकांपेक्षा त्याला दुसरं काहीही प्रिय नाही हे समजून जा. वाचकाला वाचण्यात जेवढा आनंद मिळतो तेवढा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीत नाही. त्यातच दिवाळीतही पुस्तकांच्या खरेदीवर भरघोस सूट मिळते. त्यामुळे वाचकाची आवड पारखून त्याला गिफ्ट म्हणून पुस्तक द्यावीत.

आपली प्रतिक्रिया द्या