आता नौदल घेणार प्रवेश परीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विशाल अहिरराव

नौदलात अधिकारी म्हणून रुजू होण्यासाठी आता प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. येत्या 24 सप्टेंबर रोजी नौदल पहिल्यांदाच ऑनलाईन पध्दतीने ही परीक्षा घेणार आहे. यापूर्वी तीनपैकी एका प्रक्रीयेत केवळ पदवीच्या गुणांवर आधारीत निवड होत होती.

अंतिम निवड चाचणीसाठी आलेला प्रत्येक उमेदवार हा एकाच प्रकारच्या प्रक्रीयेतून आलेला असावा. त्यात भेदभाव नसावा, या उद्देशाने ही भारतीय नौदल प्रवेश परीक्षा होत असल्याचे नौदलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रवेश परीक्षेमुळे आता नौदलात भरती होण्याचा शॉर्टकट बंद होणार असून प्रत्येकाला आता ही ऑनलाईन परीक्षा द्यावीच लागणार आहे. ही परीक्षा उमेदवाराची इंग्रजी, तार्कीक क्षमता, सामान्य विज्ञान, गणितीय योग्यता आणि सामान्य ज्ञान पडताळणीसाठी असेल. त्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. यासंबंधित अधिक माहिती नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे नौदलाकडून सांगण्यात आले आहे.