दिल्लीतील शेतकरी आंदोलन हिंसक होण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार

दिल्ली येथील शेतकऱ्यांचे आंदोलन हिंसक होण्याला संपूर्णपणे केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याची टीका आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. मोदी सरकारने हटवादीपणा सोडून कृषी कायदे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली.

आमदार चव्हाण म्हणाले, मोदी सरकारने कायदे करताना कोणाशीही चर्चा केली नाही. याआधीचे मनमोहन सिंग व वाजपेयी सरकार कोणतेही कायदे करताना सर्वांना विश्वासात घेऊन त्याची अंमलबजावणी केली जात होती. कायदे मांडण्याआधी त्याची संसदीय समितीमध्ये चर्चा होत होती. यामुळे त्या कायद्यांना सर्वसमावेशक मत असायचे, पण नरेंद्र मोदींनी चर्चेचा कोणताही मार्ग न अवलंबता घाईगडबडीने कायदे लादण्याचा मार्ग अवलंबला. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे पास केलेले आहेत. त्याला देशभरातील शेतकरी विरोध करत आहेत. शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेले दोन महिने कडाक्याच्या थंडीमध्ये बसून आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून चर्चेच्या फेऱ्या झडत आहेत. त्यातून काही मार्ग निघत नाही, शेतकऱ्यांना सरकारचा तोडगा मंजूर नसल्याचेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या