
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि 13 शेतकरी नेत्यांमधील चर्चाही निष्फळ ठरली आहे. केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेण्यास तयार नाही. त्यामुळे उद्या विज्ञान भवनात कृषीमंत्र्यांबरोबर होणाऱया चर्चेत आम्ही सहभागी होणार नाही, असे ऑल इंडिया किसान सभेचे नेते हन्नान मोल्लाह यांनी सांगितले. अडीच तास रात्री सव्वा अकरापर्यंत बैठक सुरू होती. कायद्यात सुधारणा करू, असे लेखी देतो पण कायदे रद्द करणार नाही, अशी भूमिका शहा यांनी घेतली. परंतु कायदे पूर्णपणे रद्द करावे यावर शेतकरी ठाम आहेत, अशी माहिती मोल्लाह यांनी दिली. दरम्यान, सरकार कायदे मागे घेण्यास तयार नसल्यामुळे आंदोलनाचा आणखी भडका उडणार आहे.




























































