विक्रमादित्याला आग, लेफ्टनंट कमांडरचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकेला शुक्रवारी सकाळी अचानक आग लागली. जहाजावर असलेल्या कर्मचाऱयांनी आग विझविण्याचे प्रयत्न केल्यानंतर काही वेळात आग विझली. मात्र ही आग विझवताना लेफ्टनंट कमांडर डी. एस. चौहान यांचा मृत्यू झाला.

शूर अधिकाऱयाचा मृत्यू

विक्रमादित्य युद्धनौका कर्नाटकच्या कारवार बंदरात प्रवेश करत असताना हा अपघात झाला. जहाजाच्या एका कंम्पार्टमेंटला आग लागली होती. चौहान यांनी मोठय़ा हिमतीने त्यांनी आग आटोक्यात आणली. मात्र, आग आटोक्यात आणताना धुरामुळे ते बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने कारवारमधील नौदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्या आधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या प्रयत्नामुळे जहाजाचे मोठे नुकसान टळले.