
दिल्ली, एनसीआरमध्ये वायू प्रदूषण प्रचंड वाढल्यामुळे दिल्ली सरकारने 50 टक्के कर्मचाऱयांसाठी वर्क फ्रॉम होमची सुविधा जाहीर केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता सरकारी विभागात केवळ 50 टक्के कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहतील, परंतु सरकारने काही सेवांसाठी वर्क फ्रॉम होमच्या नियमात पूर्णपणे सूट दिली आहे. यामध्ये हॉस्पिटल, आरोग्य सेवेत काम करणारे कर्मचारी, फायर सर्विस, पाणी विभाग, सार्वजनिक परिवहन, वीज विभाग, स्वच्छता विभाग, निगर निगममध्ये काम करणारे कर्मचारी, पर्यावरण प्रदूषण नियंत्रण, धूळ नियंत्रण विभाग, ग्रेप लागू करणारी पथके आदींचा समावेश आहे.


























































