
आयआरएस अधिकारी समीर वानखेडेने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनने दिग्दर्शित केलेल्या वेबसिरीज विरोधात दाखल केलेला अब्रुनुकसानीचा दावा दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावला.
गेल्यावर्षी ही वेबसिरीज प्रदर्शित झाली. यामधील एका दृश्याद्वारे आपली प्रतिमा मलिन केली गेली आहे. हे दृश्य तत्काळ वेबसिरीजमधून काढून टाकावे. या वेबसिरीजची निर्माती कंपनी रेड चिलीज् यांनी भरपाई म्हणून मला दोन कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी वानखेडेने केली होती.
घटना घडली तेथील न्यायालयातच हा दावा दाखल केला जाऊ शकतो. वेबसिरीज जगभरात प्रदर्शित झाली असली तरी त्याचा दावा कोणत्याही कोर्टात दाखल होऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने तशा प्रकारचा निकाल दिला आहे, असे न्यायालयाने नमूद केले.
स्वंयघोषित मानहानी
आपण राहतो तेथे मानहानी झाल्यास तेथील न्यायिक क्षेत्रात ती ग्राह्य धरली जाते. जेथे आपल्याला कोणी ओळखत नाही अशा ठिकाणी अब्रुनुकसानी झाल्यास ती स्वंयघोषित मानली जाते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
Delhi HC Dismisses Sameer Wankhede’s Defamation Suit Against Aryan Khan’s Web Series
The Delhi High Court has rejected IRS officer Sameer Wankhede’s ₹2 crore defamation suit against Aryan Khan’s web series. The court ruled that the claim lacked territorial jurisdiction. Get the full legal update on saamana.com





























































