अर्णब गोस्वामीचे हायकोर्टाने मुस्काट फोडले; समांतर न्यायालय चालवू नका, जिभेला लगाम द्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरडाओरड करीत वाटेल ते बरळणारा रिपब्लिक टीव्हीचा अँकर, संपादक अर्णब गोस्वामीचे दिल्ली उच्च न्यायालयाने चांगलेच मुस्काट फोडले आहे. तपास, खटला सुरू असताना तुम्ही आरोपी समजून एखाद्याची मीडिया ट्रायल घेऊ शकत नाही. समांतर न्यायालय चालवू शकत नाही अशा स्पष्ट शब्दात न्यायालयाने अर्णबला सुनावले आणि नोटीस बजावली आहे.

काही वर्षांपूर्वी काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. या मृत्यूप्रकरणी सातत्याने रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामीकडून बेछूट आणि हेतुपुरस्सर आरोप केले जात आहेत अशी याचिका शशी थरूर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात केली आहे. माझी प्रतिमा मलिन केली जात आहे. या अर्णबच्या मीडिया ट्रायलला रोखण्यात यावे अशी मागणी थरूर यांनी याचिकेत केली आहे. त्यावर गुरूवारी न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी न्यायालयाने 1 डिसेंम्बर 2017 रोजी दिलेल्या निकालाची आठवण करून दिली. तपास यंत्रणांकडून तपास सुरु असताना, तसेच न्यायालयात खटला सुरू असताना मिडियाकडून कोणालाही दोषी ठरवता येणार नाही. मीडिया ट्रायल घेऊन कोणालाही आरोपीच्या पिंजऱ्य़ात उभे करता येणार नाही.मीडियाचा आवाज दाबण्याचा प्रश्न नाही पण कायद्यानुसार मीडिया ट्रायल रोखली जाईल हे लक्षात घ्या.

समांतर न्यायालय चालवू शकत नाही

‘जबाबदार पत्रकारिता ही काळाची गरज आहे. प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यात कुणीही हस्तक्षेप करत नाही, पण तपास अहवालांचे पावित्र्यही जपा. मीडिया हे काही पुरावे गोळा करण्याच्या क्षेत्रात नाही. पुरावे कसे गोळा केले जातात आणि त्यांची कशी ओळख होते हे माहीत नाही का? पोलिसांच्या तपासात, आरोपपत्रात जे सांगितले त्यावर समांतर न्यायालय चालवू शकत नाही. दिल्ली हायकोर्ट