टिक टॉक बंदी याचिकेवर 15 एप्रिलला सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

‘टिक टॉक’ या ऍपवरून अश्लील मजकूर पसरवला जात असल्यामुळे या ऍपवर बंदी घालण्यात यावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आता 15 एप्रिलला सुनावणी होणार आहे.

टिक टॉकवर बंदी घालावी, अशी सूचना मद्रास हायकोर्टाने केंद्र सरकारला केली होती. टिक टॉक हे चिनी ऍप्लिकेशन असून बायटेक डान्स या कंपनीने हे ऍप बनवले आहे. कोटय़वधी लोक हे ऍप डाऊनलोड करत असून त्या माध्यमातून अश्लील आणि समाजविघातक गोष्टी पसरवल्या जात असल्याच्या कारणावरून मदुराईच्या मद्रास हायकोर्टाने ही सूचना केली होती.