दिल्ली हायकोर्टाचा बजरंग-विनेशला धक्का, डब्ल्यूएफआय निवडणुकीविरुद्धची याचिका फेटाळली

बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट या हिंदुस्थानच्या ऑलिम्पियन कुस्तीपटूंना दिल्ली हायकोर्टातून मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या (डब्ल्यूएफआय) निवडणुकांना आव्हान देणारी त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. अनेक सुनावण्यांमध्ये हे सर्व याचिकाकर्ते कोर्टासमोर उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने याचिका रद्द केली. डब्ल्यूएफआयमधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संजय सिंह यांनी अनीता श्योराण यांचा पराभव केला होता. अनिता यांना देशातील या अव्वल मल्लांचा पाठिंबा होता. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती मिनी पुष्कर्णा यांनी 27 नोव्हेंबर रोजी घेतली. सुनावणीदरम्यान कोणतेही याचिकाकर्ते उपस्थित नसल्याचे दिसून आले.