दिल्ली दंगलीशी संबंधित देशद्रोह प्रकरणात शरजील इमामला जामीन, 4 वर्षांपूर्वी झाली होती अटक

दिल्ली उच्च न्यायालयाने विद्यार्थी नेता शरजील इमाम याला 2020 मधील दंगलप्रकरणी जामीन मंजूर केला आहे. शरजील इमाम याला देशद्रोह आणि बेकायदेशीर कारवायांच्या आरोपांवरून अटक करण्यात आली होती. पण अन्य खटल्यांमुळे शरजील इमामला तुरुंगातच रहावे लागणार आहे. शरजील इमाम याने 13 डिसेंबर 2019 ला जामिया मिलिया इस्लामियामध्ये आणि 16 डिसेंबरला 2019 ला अलिगढ मुस्लिम विद्यापीठात भाषण केले होते. आसाम आणि ईशान्य भारतातील राज्ये देशापासून वेगळे करण्याची धमकी त्याने भाषणातून दिल्याचा आरोप आहे.

शरजील इमामविरोधात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल ब्रांचने गुन्हा नोंदवला होता. तो 28 जानेवारी 2020 पासून ताब्यात आहेत. ज्या कलमांतर्गत खटला सुरू आहे, त्यात जास्तीत जास्त शिक्षा ही 7 वर्षे आहे. त्यातील निम्मी शिक्षा मी भोगली आहे. त्यामुळे आपल्याला जामीन द्यावा, असे शरजील इमाम याने याचिकेत म्हटले होते.

शरजील इमामवर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल ब्रांचने एफआयआर दाखल केला होता. सुरुवातीला प्रकरण राजद्रोहचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर यूएपीएचे कलम 13 दाखल करण्यात आला होता.