‘आयसीसी’ कसोटी क्रमवारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कसोटी क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या ‘टीम इंडिया’ने विजयामागून विजय मिळविण्याचा सपाटा लावलाय. त्याचा फायदाही त्यांना मंगळवारी जाहीर झालेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत झाला. मयांक अग्रवालने द्विशतकासह केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर फलंदाजी क्रमवारीत टॉप-10 मध्ये स्थान मिळविले. कर्णधार विराट कोहलीसह चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे व मयांक अग्रवाल या चार हिंदुस्थानी फलंदाजांचा टॉप-10 मध्ये समावेश आहे.

फलंदाजी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ 931 गुणांसह अव्वल स्थानावर असून, विराट कोहली दुसऱया स्थानावर आहे. विराट व स्मिथमध्ये आता केवळ तीन गुणांचा फरक राहिला असून विराटला पुन्हा ‘नंबर वन’चे सिंहासन काबीज करण्याची संधी असेल.

उमेश यादव, इशांत शर्माला फायदा
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत अफलातून गोलंदाजी केलेल्या उमेश यादव व इशांत शर्मा यांना गोलंदाजी क्रमवारीत फायदा झाला आहे. इशांतने 22 व्या स्थानावरून 17 व्या, तर उमेशने 24 व्या स्थानावरून 21 स्थानावर झेप घेतली आहे.