दिल्लीतील पत्रकारांचीही कोरोना टेस्ट होणार, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
arvind_kejriwal

मुंबई आणि चेन्नईत पत्रकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दिल्लीतही आता पत्रकारांची कोरोनाची टेस्ट होणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे.

दिल्लीत आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी डिजिटल पत्रकार परिषद घेतली. त्यात बोलतना अरविंद केजरील यांनी जाहीर केले की दिल्लीत जेवढे पत्रकार असतील त्यांची कोरोना टेस्ट होईल. ट्विटर विचारलेल्या एका प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.

दिल्लीत आज कोरोनाचे 75 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2156 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत 433 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.