
देशभरात विविध ठिकाणी आज रावण दहन करून विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीतील एका रावण दहन कार्यक्रमात सहभागी होणार होते. मात्र संततधार पावसामुळे त्यांनी हा बेत रद्द केला. पूर्व दिल्लीतील उत्सव मैदानावर इंद्रप्रस्थ रामलीला समितीने आयोजित केलेल्या रावण दहन समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार होते. अधिकृत माहितीनुसार, पंतप्रधान संध्याकाळी 6 वाजता पारंपरिक रावण दहन समारंभासाठी पोहोचणार होते. मात्र संततधार पावसामुळे त्यांनी कार्यक्रमास जाणे टाळले.