सुन्नी वक्फ बोर्डाशिवाय कुणालाच तडजोड नकोय- मुस्लिम पक्षकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme-court-of-india

अयोध्या रामजन्मभूमी प्रकरण न्यायालयाबाहेर तडजोडीने मिटवण्यावर शुक्रवारी मुस्लिम पक्षकारांनी आक्षेप घेतला. सुन्नी वक्फ बोर्डाशिवाय आम्हाला कुणालाच या प्रकरणात कसलीही तडजोड करायची नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. मध्यस्थी समितीपुढे झालेल्या गोष्टी जाणूनबुजून लीक करण्यात आल्या असा आरोपही त्यांनी केला.

मुस्लिम पक्षकारांच्या वतीने सहा प्रतिनिधींनी एकत्रितपणे आपली भूमिका मांडली. अयोध्या खटल्यातील मुख्य मुस्लिम पक्षकार एम. सिद्दिक यांची बाजू मांडणारे ऍड. इजाज मकबूल यांनी सुन्नी वक्फ बोर्डाची खटल्यातून माघार घेण्याची भूमिका ऐकून आम्हाला धक्का बसलाय अशी प्रतिक्रिया दिली. सर्वोच्च न्यायालय लवकरच निकाल देणार आहे. अशा परिस्थितीत सुन्नी वक्फ बोर्ड वगळता कोणताही मुस्लिम पक्षकार न्यायालयाबाहेर तडजोडीला तयार नाही. मध्यस्थी समितीचा प्रस्ताव आम्ही स्वीकारणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अयोध्या खटल्याचा निकाल राखून ठेवला. याचवेळी मध्यस्थी समितीने आपला अहवाल सादर केला.

म्हणे निकाल आमच्या बाजूने लागेल!
अयोध्या खटल्याचा निकाल आमच्याच बाजूने लागेल अशा गमजा मुस्लिम पक्षाचे वकील जफरयाब जिलानी यांनी मारल्या. सर्वोच्च न्यायालयात जो नकाशा फाडण्यात आला तो 1986 मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकातील आहे. या नकाशाला न्यायालयानेही जुमानले नाही, असे त्यांनी नमूद केले.