विरोधी पक्षाच्या खासदारांना दिल्ली पोलिसांनी इंडिया गेटकडे जाण्यापासून रोखले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी विरोधी पक्षाचे सर्व खासदार यांना इंडिया गेटकडे जाण्यापासून दिल्ली पोलिसांनी रोखले आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षाचे खासदार हे गांधी स्मृती भवनाच्या दिशेने निघाले आहेत. तीन बसमधून विरोधी पक्षाचे खासदार महात्मा गांधी यांच्या स्मृती भवनाकडे रवाना झाले आहेत.

”देशभरातील आपले विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते, त्यांच्यासोबत विरोधी पक्षातील खासदार देखील रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे आम्ही इंडिया गेटच्या दिशेने जाणार होतो. मात्र पोलिसांनी बरिकेड्स लावून रस्ता रोखला आहे. त्यानंतर आम्ही गांधी स्मृती भवनाच्या दिशेने निघालो आहेत. मला विद्यार्थ्यांना सांगायचे आहे की संपूर्ण विरोधी पक्ष तुमच्यासोबत आहे. तुमच्यासोबत होणाऱ्या हिंसाचाराच्या विरोधात आहोत”, असे राहुल गांधी यांनी सांगितले.