अणुबॉम्बचा मोदींना ताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘अणुबॉम्ब’ विधान त्यांना तापदायक ठरत आहे. या विधानावर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे. यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार काँग्रेसने केली आहे. यानंतर मोदींच्या या विधानाचा अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला आहे.

राजस्थानच्या बाडनेर येथे निवडणूक येथे निवडणूक प्रचारसभेला बोलताना मोदी पाकिस्ताला उद्देशून म्हणाले होते, आम्ही तुमच्या अणुबॉम्बच्या धमक्यांना भीक घालत नाही. आमच्याकडेही अणुबॉम्ब आहेत आणि ते काही आम्ही दिवाळीसाठी ठेवलेले नाहीत. मोदींनी सभेत पाकिस्तानला इशारा दिला होता. मोदींच्या या विधानावर आक्षेप घेत काँग्रेसने 22 एप्रिल रोजी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. पंतप्रधानांनी या विधानाद्वारे सैन्याला अणुबॉम्ब वापरण्याचे आवाहन केले आहे. हा प्रकार म्हणजे आचारसंहितेचा भंग करणारा आहे. त्यामुळे मोंदीवर काही काळासाठी प्रचारासाठी बंदी घालण्यात यावी.

मोदींच्या या विधानावर टीका करताना पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विटद्वारे म्हटले होते, जर हिंदुस्थानने आपल्याकडील अणुबॉम्ब दिवाळीसाठी ठेवला नसेल तर पाकिस्ताननेही त्यांच्याकडील अणुबॉम्ब ईदसाठी नक्कीच ठेवला नसेल. त्यामुळे मोदी अशाप्रकारे खालच्या पातळीला जाऊन राजकारण का करीत आहेत, असा सवालही त्यांनी विचारला होता.