मैत्री केली नाही म्हणून अश्लील फोटो बनवून तरुणीची केली बदनामी; आरोपीला अटक

facebook-friend-1

अनेकदा मैत्री करण्यासाठी मुलींवर दबाव टाकण्यात येतो. त्यातून एखाद्या मुलीने मैत्रीसाठी नकार दिल्यास तिचा सूड उगवण्याच्या घटना घडत आहेत. मुलींवर हल्ले करण्यापासून ते अॅसिड फेकण्यापर्यंतच्या घटना घडत आहेत. एका मुलीने मैत्री करण्यासाठी नकार दिल्याने एका तरुणाने मुलीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ बनवले आणि ते फेसबुकवर व्हायरल करण्याची भिती दाखवत मुलीला ब्लॅकमेल केले. त्याने फेसबुकवर फेक अकाउंट बनवत काही फोटो व्हायरल केले. तसेच मुलीचा फोन नंबरही शेअर केला. मुलीची बदनामी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून देशबंधु सिंह असे त्याचे नाव आहे.

नवी दिल्लीतील सीआर पार्कमध्ये घडलेल्या या घटनेने मुलीला मनस्ताप सहन करावा लागला आहे. मुलीने याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केल्यावर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यात आरोपीने मुलीच्या नावाने तीनचार फेक अकाऊंट बनवल्याचे पोलिसांना समजले. त्या फेक अकाउंटद्वारे आरोपीने मुलीचे अश्लील फोटो बनवत ते अपलोड केले. या फोटोने त्याने मुलीला ब्लॅकमेल करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, मुलीची बदनामी करण्याच्या हेतूने त्याने फोटो व्हायरल केले आणि तिचा फोन नंबरही शेअर केला. मुलीचे अश्लील फसबुक अकाउंट बनवल्यानंतर त्याने मुलीला फोन करून शिवीगाळ केली.

पोलिसांच्या सायबर सेल विभागाने आरोपीची सर्व माहिती एकत्र केली. त्याने अश्लील फोटो कसे बनवले, फेक अकाउंट बनवत त्यावर ते अपलोड केले. ही माहिती पोलिसांना मिळाली. आरोपी मुलीसोबत नोयडाच्या कंपनीत काम करत होता. मुलीने त्याच्याशी मैत्री करण्यास नकार दिला होता. तसेच तो मुलीला आवडत नसल्याने ती त्याच्याशी बोलत नव्हती. त्याचा राग मनात धरत त्याने तरुणीला बदनाम करण्यासाठी हे केल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाईलवरून बनवलेल्या फेक अकाउंटचा माग काढत पोलीस आरोपीपर्यंत पोहचले. आरोपीचे नाव देशबंधु सिंह असल्याचे पोलिसांनी सांगितले. देशबंधु मित्राच्या मोबाईलच्या हॉटस्पॉटचा वापर करत फेसबुकवर मुलीचे फेक अकाउंट बनवत होता. त्यावर अश्लील फोटो, व्हिडीओ अपलोड करत मुलीला बदनाम करण्याचा त्याचा प्रयत्न होता. मित्राच्या हॉटस्पॉटचा वापर करून अकाउंट ओपन केल्यास पोलिसांना पुरावे मिळणार नाही, असे त्याला वाटत होते. मात्र, पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या