
राजधानी दिल्लीतील प्रदूषण काहीही केल्या कमी होत नसून शुक्रवारी दिल्लीतील हवा जगात सर्वाधिक विषारी होती. दिल्लीच्या हवेचा एक्यूआय हा 506 इतका नोंदविला गेला. ही पातळी अतिशय धोकादायक मानली जाते.
दोन आठवडय़ांपूर्वी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी वाढत्या प्रदूषणाची दखल घेत वकिलांना व्हर्च्युअल सुनावणीच्या सुविधेचा वापर करण्याची सूचना केली होती. वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीतील शाळांमध्ये डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व क्रीडा स्पर्धा रोखण्यात आल्या आहेत. तसे आदेश दिल्ली सरकारने जारी केले आहेत. पुढील सूचना येईपर्यंत सर्व शैक्षणिक संस्था आणि आस्थापनांना हे आदेश लागू राहतील.

























































