वायुप्रदूषण रोखण्यासाठी जपानी तंत्रज्ञानाचा विचार करा!- सुप्रीम कोर्ट

349
supreme-court-of-india

राजधानी दिल्लीसह उत्तर हिंदुस्थानच्या बहुतांश भागांत वायुप्रदूषणाची समस्या गंभीर बनल्याने सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले. हे प्रदूषण रोखण्यासाठी जपानमधील हायड्रोजनवर आधारलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल का याचा विचार करा आणि 3 डिसेंबरला याबाबत आराखडा सादर करा असा आदेशही न्यायालयाने या वेळी केंद्र सरकारला दिला.

दिल्लीसह आसपासच्या राज्यांतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाल्याचे बुधवारीही निदर्शनास आले. यावरून सरकारी यंत्रणांचे अपयश उजेडात आल्याने सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि नवनियुक्त सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठाने सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला.

कायमस्वरूपी उपाय शोधा!

उत्तर हिंदुस्थानातील वायुप्रदूषण डोळ्यांसमोर ठेवून जपानच्या विद्यापीठाने संशोधन केले. हे संशोधन अत्यंत नावीन्यपूर्ण आहे. वायुप्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी संबंधित जपानी तंत्रज्ञान वापरता येऊ शकते असे सरकारला वाटते असा युक्तिवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केला. त्यावर न्यायालयाने या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधा असे निर्देश सरकारला दिले.

 

आपली प्रतिक्रिया द्या