300 दहशतवादी ठार झाले की झाडं पडली? एअर स्ट्राईकवर सिद्धू यांचे वादग्रस्त विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
नवज्योतसिंग सिद्धू (काँग्रेस) अमृतसर-एकूण उत्पन्न-९.९० कोटी

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

हिंदुस्थानच्या हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या एअर स्ट्राईकवरून जोरदार राजकारण सुरू झाले आहे. विरोधी पक्ष मोदी सरकारकडे एअर स्ट्राईक झाल्याचे पुरावे मागत असतानाच पंजाबचे मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांनीही वादग्रस्त विधान केले आहे.

एअर स्ट्राईकवर सिद्धू यांनी टि्वट केले आहे. त्यात 300 दहशतवाद्यांना ठार केलंत की नाही. जर नसेल तर मग कुठल्या उद्देश्याने एअर स्ट्राईक केलंत. की फक्त झाडं पाडायला गेला होतात ? असा सवाल करत त्यांनी राजकीय फायद्यासाठी एअर स्ट्राईकचं हे नाटक होतं का. असेही वादग्रस्त विधान केले. तसेच लष्कराचं राजकरण करणं बंद करा. जितका हा देश पवित्र आहे तितकीच सेनाही पवित्र आहे. असे म्हणत सिद्धू यांनी ‘महागडे दुकान बेचव जेवण’ असा टोलाही सरकारला हाणला आहे.

या टि्वट शिवाय सिद्धू यांनी एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. ज्यात एअर स्ट्राईकनंतर बालाकोट येथील काही नागरिक तेथे काहीच घडलं नसल्याचे सांगत आहे. दरम्यान, वादग्रस्त विधान कऱण्याची सिद्धू यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अनेकवेळा वादग्रस्त विधान करून लोकांचा रोष ओढवून घेतला आहे. पुलवामा हल्ल्यानंतरही सिद्धू यांनी दहशतवादी हल्ल्यासाठी संपूर्ण देशालाच टारगेट करणे योग्य नसल्याचे सांगत पाकिस्तानप्रती त्यांची जवळीक व्यक्त केली होती. यावरून देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर कपिल शर्मा शोमधून त्यांची हकालपट्टीही करण्यात आली होती.