
दिल्ली निवडणुकीची तारीख जवळ आल्यानंतर आता रंगत वाढत चालली आहे. विविध पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता प्रचार सभांचा झंजावात सुरू होईल. दिल्ली निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने 40 स्टार प्रचारकांची नावे जाहीर केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्र्यांची फौज भाजपचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातून केंद्रात गेलेल्या दोन नेत्यांची नावे आहेत.
केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय माहिती, प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर या दोन महाराष्ट्रातील नेत्यांची नावे स्टार प्रचारकांच्या यादीत आहे.
भाजपा ने दिल्ली चुनाव 2020 के लिए पार्टी के स्टार प्रचारकों की सूची जारी की pic.twitter.com/6e3tFdXblg
— ANI_HindiNews (@AHindinews) January 22, 2020




























































