मुंबईसह देशात तापमानात बदल; फेब्रुवारीपासूनच उकाडा जाणवायला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह आता देशातील तापमानात बदल होत आहेत. जानेवारी महिन्यात उत्तर हिंदुस्थानात थंडीची लाट होती, तसेच पर्वतीय भागात हिमवृष्टीही झाली होती. आता तापमानात बदल होत असून राजधानी दिल्लीसह, मुंबई आणि मध्य हिंदुस्थानात फेब्रुवारी महिन्यापासूनच उकाडा जाणवायला सुरुवात झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी सरासरी तापमानात वाढ झाली आहे.

दिल्लीप्रमाणेच मुंबईतही तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे उकाडा जाणवायला सुरुवात झाली आहे. मुंबईत काही ठिकाणी उष्णतेची लाट जाणवू लागली आहे. गेल्या काही दिवसांत सांताक्रूझ वेधशाळेत दिवसाचे कमाल तापमान ३५.१° सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे, जे सामान्यपेक्षा सुमारे ४.२° सेल्सिअस जास्त आहे. येत्या काही दिवसांत मुंबईत उष्णतेची लाट कायम राहण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रातही सरासरी तापमानात वाढ होत आहे.

राजधानी दिल्लीत फेब्रुवारीमध्ये तापमान सातत्याने वाढत आहे. २ फेब्रुवारी २०२६ रोजी नोंदवलेले कमाल तापमान १७.५ अंश सेल्सिअस होते आणि आता ते २५.१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. दिल्लीत उष्णतेची लाट सातत्याने वाढत आहे. दिवसा कमाल तापमान सातत्याने वाढत आहे. तसेच आता मध्य आणि उत्तर हिंदुस्थानातूनही थंडी ओसरत असून सरासरी तापमान वाढत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.