एका मिनिटात 1140 टाळ्या वाजवत रचला विश्वविक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कधी तुम्ही विचार केलाय की, एका मिनिटात साधारणपणे आपण किती वेळा टाळ्या वाजवू शकतो… परंतु 20 वर्षीय डेल्टन मेयेर या तरुणाने अवघ्या एका मिनिटात 1140 टाळ्या वाजवून विश्वविक्रम रचला आहे. म्हणजेच एका सेकंदाला सरासरी त्याने 19 टाळ्या वाजवल्या आहेत. त्याच्या या कामगिरीचा व्हिडीओ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या यूटय़ुब चॅनेलवर शेअर केला आहे. डेल्टन याने हा विक्रम करण्यासाठी मनगटावर टाळ्या वाजवण्याचे तंत्र वापरले. या तंत्रात दुसऱया हाताच्या तळव्याला मनगट आणि बोटे वापरून टाळी वाजवावी लागते. मार्च महिन्यात त्याने हा विक्रम केला, परंतु आता त्याची नोंद झाली आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड एली बिशप या व्यक्तीच्या नावावर होता. त्यांनी एका मिनिटात 1103 वेळा टाळ्या वाजल्या होत्या.