सैतवडे येथील वीज वाहिनी बदलण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
वीज ग्राहकांना येत्या पावसाळ्यात अखंडित वीज पुरवठा सुरू राहण्यासाठी मान्सून पूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे महावितरणने  आहेत, असे असले तरी तालुक्यातील सैतवडे येथील खतीब मोहल्ला व गुम्बद मोहल्ल्यातील काही भागातील जुनाट वीजवाहिनी न बदलल्याने  या ठिकाणी वीज पुरवठा खंडित होण्याची व अपघात होण्याची दाट शक्यता आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरीत वीजवाहिन्या बदलण्याची कार्यवाही करावी,  अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे.