
बिडी उद्योग सध्या आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय बिडी उद्योग महासंघाने 28 टक्के जीएसटीचा उद्योग आणि रोजगारावर होणाऱया परिणामावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. या वेळी हा उद्योग वाचविण्यासाठी जीएसटी कमी करण्याची मागणी करण्यात आली. बिडी उत्पादनामुळे जवळपास 90 लाख ते एक कोटी लोकांना रोजगार मिळतो. बहुसंख्य कामगार महिला नक्षलग्रस्त भागातील असून तिथे रोजगाराचा अभाव आहे. त्यामुळेच हा उद्योग टिकणे गरजेचे आहे असे स्वदेशी जागर मंचच्या राष्ट्रीय संयोजक अश्वनी महाजन यांनी सांगितले.

























































