राज्यातील मंदिरे पुन्हा उघडण्याची मागणी, भाजपचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये बंद केलेली सर्व मंदिरे तातडीने उघडण्याची मागणी आज भाजप मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

राज्यात मिशन बिगीन अगेन सुरू झाले आहे. त्याअंतर्गत बाजारपेठ काही निर्बंधांसह पुन्हा हळूहळू सुरू होत आहेत. त्याचबरोबर राज्यात आणि शहरांत बस वाहतूक सुरू केली आहे. राज्यात लवकरच हॉटेल आणि उपाहरगृहे सुरू करण्यास परवानगी दिली जाणार आहे. देशातील समाज देवाधर्माशी जोडला गेला आहे.

आजच्या संकट काळात या समाजाला मानसिक धार्मिक आधार मिळण्याची गरज आहे. त्यामुळे लोकांसाठी बंद केलेली सर्व मंदिरे शारिरीक अंतराचे भान राखत खुली करावी, अशी मागणी मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या