
शेअर बाजारात शेअर्स, बाँड्स आणि म्युच्युअल फंड सुरक्षित डिजिटल स्वरूपात साठवण्यासाठी डिमॅट खाते आवश्यक असते.
खातेधारकाबाबत काही दुर्दैवी घटना घडल्यास खाते काढताना ज्या व्यक्तीचे नाव नॉमिनी म्हणून नोंदवले असते, त्या व्यक्तीकडे सर्व शेअर्सची मालकी जाते.
नॉमिनी नसल्यास कायदेशीर वारसांना क्लेम करावा लागतो. त्यासाठी सक्सेशन सर्टिफिकेट (Succession Certificate) किंवा कायदेशीर वारस प्रमाणपत्र दाखवावे लागते.
खातेदाराच्या मृत्यूनंतरही खात्यातील शेअर्स पूर्णतः सुरक्षित राहतात. नॉमिनीला मृत्यूचे प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांसह डिपॉझिटरी पार्टिसिपेंटकडे (DP) अर्ज करावा लागतो.
जर खाते संयुक्तपणे ठेवलेले असेल, तर डीपी (DP) पडताळणी करून खात्यातील सर्व सिक्युरिटीज सह-खातेदार किंवा नॉमिनीच्या नावावर असलेल्या डिमॅट खात्यात वर्ग करतात.
























































