परळीची ओळख असलेल्या विद्युत केंद्राच्या गगनचुंबी चिमण्या पाडायला सुरुवात करण्यात आली आहे. मराठवाड्यातील सर्वात जुने असलेले एकमेव औष्णिक विद्युत केंद्र असलेले परळीच्या वीज निर्मिती केंद्रातील चिमणी गुरुवारी पाडण्यात आली. साधारण 40 वर्ष जुनी असलेली चिमणी पाडण्यात आली आहे. येथे कोळशापासून विद्युत निर्मिती केली जात होती. 210 मॅगव्हटचे तीन संच येथील जुन्या औष्णिक विद्युत केंद्रात होते. मात्र, या संचाची वयोमर्यादा पूर्व झाल्याने हे संच काही वर्षापूर्वी बंद करण्यात आले होते. त्यातील संच क्र.4 ची चिमणी गुरुवारी पाडून जमीनदोस्त करण्यात आली.
210 मेगाव्हेट वीज निर्मितीचे हे तीन संच बंद केल्यानंतर या संचासाठी लागणारी सगळी सामग्री याआधीच भंगारात काढण्यात आली होती. पाचवे ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिर आणि परळी औष्णिक विद्युत केंद्रातील गगनचुंबी 3 ऐतिहासिक चिमण्या या बीड जिल्ह्याची ओळख होत्या. या चिमणीतून कोळशाचा धूर बाहेर यायचा. इटालियन तंत्रज्ञानाचा वापर करून भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनीने हे विद्युत केंद्र बनवले होते. दर्शनीय भाग म्हणजे ही या तीन चिमण्या होत्या त्यापैकी संच क्र.3 ची चिमणी गुरुवारी इतिहासजमा झाली. याठिकाणी आता आणखी 1 चिमणी अनुक्रमे संच क्र. 5 शिल्लक असून हीदेखील पाडण्यात येणार आहे.