डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धा; सिंधू, प्रणीत, समीरचे आव्हान संपुष्टात

408

सायना नेहवाल व किदाम्बी श्रीकांत यांना बुधवारी पराभवाचा धक्का बसल्यानंतर गुरुवारी हिंदुस्थानच्या तीन खेळाडूंचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. ऑलिम्पिक विजेती पी.व्ही. सिंधू, बी. साई प्रणीत व समीर वर्मा यांचा खेळ खल्लास झाल्यामुळे आता डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील हिंदुस्थानच्या एकेरीत जेतेपद पटकावण्याच्या आशांना सुरुंग लागला आहे.

दक्षिण कोरियाच्या ऍन सी यंग हिने पी. व्ही. सिंधू हिला 21-14, 21-17 अशा फरकाने हरवले आणि आगेकूच केली. पी. व्ही. सिंधूला सरळ दोन गेम्समध्ये पराभूत व्हावे लागले. दुहेरीतही हिंदुस्थानचा फ्लॉप शो सुरूच राहिला. चिराग शेट्टी व सात्विक रेड्डी या जोडीला पुरुषांच्या दुहेरीत हार सहन करावी लागली. प्रणव चोप्रा व सिक्की रेड्डी ही जोडीही पराभूत झाली.

आपली प्रतिक्रिया द्या