शाहरूखने दहीहंडी फोडल्याने ‘देवबंद’ नाराज

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या एका वादामध्ये अडकला आहे. त्याने कृष्णजन्माष्टमी दिवशी आपल्या वांद्रे येथील निवासस्थानी गोंविदा बनून दहिहंडी फोडली आहे. त्यामुळे ‘इस्लाम देवबंद’ ही कट्टर मुस्लिम संघटना त्याच्यावर नाराज आहे. त्यांनी कडक शब्दात त्याच्यावर टिका केली आहे.

कृष्णजन्माष्टमी दिवशी शाहरूख खानने वांद्रे येथील ‘मन्नत’ निवासस्थानी दहीहंडी फोडली होती. यावेळी त्याच्या सोबत त्याची पत्नी गौरी, मुलगा अब्राहम तसेच सिनेसृष्टीतील नामांकित व्यक्ती हजर होत्या. त्याने दहीहंडीचे फोटो सोशल मिडियावर पोस्ट करत ‘सभी को जन्माष्टमी की बधाई’ असा संदेश केला होता. परंतु त्याने फोडलेली दहीहंडी देवबंदींना आवडलेली नाही. त्यांनी त्याच्यावर कडक टिका केली आहे. ‘फतवा ऑन मोबाईल सर्विस’चे अध्यक्ष मुफ्ती अर्शद फारूकी यांनी म्हटलं की, कोणत्याही अन्य धर्माचे सण साजरे करणे हे ‘इस्लामी फलसफे’च्या विरुद्ध आहे. इस्लामाने त्याचा विरोध केला आहे.