Baramati Plane Crash: अजित पवार यांची शेवटची पोस्ट व्हायरल

पुणे जिल्ह्यातील बारामती येथे विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले आहे. या बातमीने राजकीय वर्तुळासह सर्वत्र शोककळा पसरली आहे.  अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी अजित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती.

अजित पवार एका सभेसाठी बारामती येथे खासगी विमानाने जात असताना हा अपघात झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाले होते. त्यांनी अपघाताच्या काही मिनीटापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. जिथे त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळतील महान क्रांतिकारक लाला लजपतराय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले होते.

अजित पवार यांनी ही पोस्ट बुधवारी 8 वाजून 57 मिनीटांनी एक्सवर शेअर केली होती. त्यात त्यांनी लिहीले होते की, राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे, महान स्वातंत्र्य सेनानी, स्वराज्याचे उद्घोषक, ‘पंजाब केसरी’ लाला लाजपत राय जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांची राष्ट्रनिष्ठा आपल्याला कायमच प्रेरणा देत राहील.

हा अपघात विमानाच्या लॅण्डिंग दरम्यान झाला. अपघातात विमान संपूर्ण जळून राख झाले. विमानात 5 लोकांचा मृत्यू झाला. DGCA ने या अपघाताची पुष्टी केली होती. हा अपघात कसा झाला, त्याचे काय कारण याबाबत अद्याप काही माहिती समोर आलेले नाही.