लोकप्रतिनिधींनी ‘हे’ बंद केलं पाहिजे, अजित दादांनी भरला दम

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणावर वाढत असल्यानं लोकप्रतिनिधींनी खासगी कार्यक्रम बंद केलं पाहिजे, असा दम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरला आहे. लग्न किंवा मृत्यूच्या प्रसंगी जी मर्यादा आखून दिली आहे तेवढीच संख्या असली पाहिजे. लग्नाला सगळे मिळून 50 तर मृत्यप्रसंगी 20 जणांचा आकडा निश्चित करण्यात आला आहे. त्यापेक्षा अधिक लोक चालणार नाही. आणि यापेक्षा वेगळे सोहळे पूर्णपणे बंद ठेवा, कोरोना काळात हे बंद ठेवा, असही त्यांनी यावेळी सांगितलं.

आपली प्रतिक्रिया द्या